Friday, January 17, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly Election 2024 : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

Assembly Election 2024 : मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting)प्रक्रिया पार पडत असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सर्वसामान्य लोकांपासून अनेक मोठे कलाकार, नेते मंडळींनी मतदानाला सुरुवात केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी (Marathi Cinema Celebrities) देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

सुबोध भावेने केले मतदान

सुबोध भावेने (Subodh Bhave) कसबा येथे जावून त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे. कसबा येथे असलेल्या गुजराती प्रायमरी शाळेत त्याने मतदान केले. तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सोनाली कुलकर्णीने सकाळीच बजावला मतदानाचा हक्क

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkrni) हिने आज सकाळी आकुर्डीमधील ज्ञान प्रबोधिनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सोनाली कुलकर्णी हिने यावेळी पहिल्यांदाच अगदी सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे.

प्राजक्ता माळीने केले मतदान

माझी सर्वांत महत्त्वपूर्ण जबाबदारी मी पार पाडली आहे. कळकळीचं आवाहन.. अजिबात कंटाळा न करता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा, असं आवाहन अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) केलं.

तेजस्विनी पंडीतने देखील केले मतदान (Tejaswini Pandit)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -