
पुणे: राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी(Maharashtra Assembly Election) आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. मतदानाच्या आधीच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला होता.
यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मुद्दा रंगला होता तो बारामतीच्या अजित पवार यांचा. त्यामुळे बारामतीच्या या जागेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शरद पवार यांच्याशिवाय अजित पवार हे निवडणूक लढवत आहे.
या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनेत्रा यांनीही मतदान केले. दरम्यान, ही निवडणूक आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढायची होती. जे काही आरोप झाले त्यांची चौकशी केली जाईल असे यावेळी अजित पवार म्हणाले.आज काटेवाडीत या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील जनतेनं घराबाहेर पडून आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजवावा, अमूल्य मत अचूक नेतृत्वाला द्यावे आणि लोकशाही आणखी बळकट करण्यात मोलाची भूमिका पार पाडावी, असं आवाहन आहे.#विजयी_भव_महाराष्ट्रवादी… pic.twitter.com/M7d8qqhzlZ
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 20, 2024

मुंबई: महाराष्ट्रात विधानसभेच्या(Assembly election) २८८ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते जसे शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ...
बारामतीमधून महायुतीमधून अजित पवार घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीमधून अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळू शकते.