मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच झारखंडमध्ये विधानसभेसाठी(Jharkhand Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ३८ जागांसाठी आज मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये ६७ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.
पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला झाले होते. यात ४३ जागांवर मतदान झाले होते. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६६ टक्के मतदान झाले होते.
सर्वाधिक मतदान जामताडामध्ये तर सर्वात कमी बोकारोमध्ये मतदान
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झारखंडमध्ये सर्वाधिक मतदान जामताडामध्ये झाले आहे. येथे ७६.१६ टक्के मतदान झाले. तर बोकारोमध्ये सर्वात कमी ६०.९७ टक्के मतदान झाले.
या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद झाले. यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन, भाभी सीता सोरेन, भाजप प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महतो, ऑल झारखंड स्टुडंट यूनियन पक्षाचे अध्यक्ष सुदेश महतो आणि निर्वतमान विधानसभाचे नेता प्रतिपक्ष अमर कुमार बाऊरी(भाजप) यांचा समावेश आहे.