नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रायगड : राज्यभरात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदानाची (Voting) प्रक्रिया सुरु आहे. मात्र अशातच रायगड जिल्ह्यातील (Raigad) महाडमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Maharashtra Assembly Election: आचारसंहिता भंगाच्या तक्रारी, ६७३ कोटी २२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावर भानामती (Black Magic) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यावर मधोमध तीन मडकी आणि नारळ रचण्यात आलं आहे. मडकं लाल आणि काळ्या फडक्याने बंद करून खाली नारळ अशा स्वरूपात हा भानामतीचा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी हा सगळा प्रकार उधळून लावत ही मडकी फेकून दिले आहेत.