Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune Police: पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

Pune Police: पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

पुणे: शहरात विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.



विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान होत असून, शनिवारी (ता. २३) मतमोजणी होणार आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा, हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. याशिवाय, शिरूर, पुरंदर, भोर मतदारसंघातील काही भाग येतो. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment