अरुण राव यांना एमबीबीएस व्हायची इच्छा होती. मेडिकलला अॅडमिशन मिळाली नाही. घरची परिस्थिती बेतासबेत असल्यामुळे ते अर्न अँड लर्न पद्धतीने बीएससी शिकत होते. सुरुवातीला त्यांना युनियन कार्बाइडसारख्या मोठ्या कंपनीत अप्रेंटिसशिप करायला मिळाली होती. त्यामुळे अनुभव मिळाला होता. नाईट शिफ्टमध्ये नोकरी करून दिवसा कॉलेज करून त्यांनी एमएससी पूर्ण केलं. इतक्या लहान वयापासून नोकरीस लागल्यामुळे वर्कर, युनियन लीडर, अधिकारी अशी सर्व कामे त्यांनी केली होती. त्याचाही नंतर स्वतःच्या उद्योग व्यवसायात सर्वांचे प्रश्न समजून घ्यायला त्यांना उपयोग झाला. १९८२ साली त्यांना एक संधी चालून आली. एमआयडीसीमध्ये काही उद्योजकांना गाळे मिळू शकणार होते. त्यासाठी अनेक अर्ज आले होते आणि केवळ तीन जणांची निवड झाली. त्यात अरुणराव यांना एक गाळा मिळाला आणि त्यांची स्वतःचा उद्योग करण्याची मुळं तिथे रुजली. एमआयडीसीची टेक्निकल असिस्टंट स्कीम अशी होती की तुम्ही स्वतःच भांडवल सुरुवातीला उभं करू नका पण तुम्ही तुमची अभ्यासाची प्रमाणपत्र आमच्याकडे गहाण ठेवा व एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्शन करा, त्यानुसार अरुणराव यांनी आपली बीएससी, एमएससीची प्रमाणपत्र एमआयडीसीकडे गहाण ठेवली. त्यांना पहिला प्लॉट मिळाला. केवळ चार वर्षांत इमानदारीनं पैसे फेडल्यामुळे त्यांना एमआयडीसीने आणखी एक प्लॉट उपलब्ध करून दिला आणि राव ए. ग्रुपच्या दोन फॅक्टरी सुरू झाल्या.
आज राव ए. ग्रुप ऑफ कंपनीच्या नवू कंपन्या आहेत. त्याद्वारे ते मायनिंग, रबर, बायो केमिकल अशा अनेक प्रकारची केमिकल्स बनवतात. निर्यात सुरू झाली आणि आज जगातल्या पाचही खंडामध्ये त्यांच्या रसायनांची निर्यात होत आहे. आज जवळजवळ त्यांची ५० ते ६०% उत्पादन निर्यात होत आहे. हे करत असताना त्यांच जे तरुणपणातलं स्वप्न होतं डॉक्टरेट करणं ते देखील त्यांनी पूर्ण केल होतं. केमिकल उद्योगांमध्ये व्यवस्थित पाय रोवल्यावर इतरही नाविन्याचा शोध राव यांच मन घेऊ लागल. त्यांना आढळलं की रासायनिक फॅक्टरीतून खूप सॉलिड वेस्ट तयार होते. त्याचं सुद्धा नीट व्यवस्थापन झालं पाहिजे कारण यामध्ये बायो मेडिकल वेस्ट, इंडस्ट्रियल हजारडस वेस्ट असा अनेक प्रकारचा प्रदूषित कचरा तयार होत असतो. त्यासाठी त्यांनी” इको फ्रेंड इंडस्ट्री” नावाची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. राज्यभरातलं वेस्ट मटेरियल गोळा करून ते या फॅक्टरीत रिसायकल करत. काहीतून मेटल मिळतं त्याचा पुनर्वापर केला जातो. गेल्या १० वर्षांत २५ लाख टन वेस्ट या कंपनीने डिस्पोज केली आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्त राज्य करण्यामध्ये आपल्या कंपनीचा थोडा अधिक हातभार लागला असल्याच डॉक्टर राव सांगतात.
या ठिकाणी येणाऱ्या ई-वेस्टमधून बिघडलेले संगणक पुन्हा नीट करून नवी मुंबईतील गरीब मुलांना ५०० ते १००० रुपयांत देण्यात येतात. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की अशा प्रकारच्या उद्योगाकरता लॉजिस्टिक्स स्वतःचं असण्याची गरज आहे त्यामुळे त्याने “इकोलॉजिस्टिक्स” या कंपनीची स्थापना केली आणि त्या मार्फत ट्रान्सपोर्टेशन सुरू केल. आज त्यांच्या कंपनीकडे २२ वाहन आहेत. त्यानंतर त्यांनी “इको अँड कंपनी” ही सेवा देणारी कंपनी ही सुरू केली. त्यांची पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगर येथे ८० ते १०० एकर जमिनीवर शेती होती. त्यांना ड्रोन तंत्र ज्ञानानी आकर्षित केलं आणि त्यांनी स्वतःच “रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन” सुरू केल. या संस्थेतर्फे मुलांना ड्रोनच प्रात्यक्षिकासह ट्रेनिंग त्यांच्या शेतामध्ये दिलं जात. आज राव ए. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या नऊ फॅक्टरी आहेत. जवळजवळ साडेतीनशे कर्मचारी या सर्व कंपन्यांमध्ये काम करत आहेत. त्यांची दोन्ही मुलं या क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेऊन त्यांच्या कंपनीमध्ये रुजू झाली.
घरातून कोणतही बॅकग्राऊंड नसताना फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर म्हणून छोट्या स्वरूपा केमिकल सारख्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकून नऊ फॅक्टरींचा डोलारा उभा राहिल्यावर पुरस्कार मिळणे हे साहजिकच आहे. त्याप्रमाणे डॉक्टर अरुण राव यांना उद्योग श्री पुरस्कार, बँक ऑफ इंडिया एक्सपोर्ट एक्सेलन्सी अॅवॉर्ड, बिझनेस मॅन ऑफ द इयर असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. धंद्यामध्ये सतत कार्यरत असले तरीही राव यांना क्रिकेट खेळण्याची आणि पाहण्याची मनापासून आवड आहे. आपला छंदही उद्योजकांनी जोपासावा त्यातून आपल्याला मानसिक आनंद मिळतो, तणाव मुक्ती मिळते असं ते म्हणतात. त्यासाठी ते संगीतही ऐकतात. त्याशिवाय निर्मल वेल्फेअर सोसायटी या एनजीओमार्फत ते गरीब महिला, गरीब रुग्णांना मदत करत असतात. केमिकल हे अणू, रेणू, परमाणूमध्ये वसलेले आहेत. केमिकल कोणाच्याही मालकीचे नाहीत त्यामुळे प्रदूषण टाळून केमिकल क्षेत्रात व्यवसाय केलात, तर देशाच्या, स्वतःच्या विकासाला हातभार लावाल अस ते म्हणतात. नोकरी न करता उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना डॉक्टर अरुण राव यांचा हा जीवन प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…