मुंबई : लोकसभेच्या निवडणुकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी (Assembly election 2024) मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची जबाबदारी मतदारांचीच असणार आहे. ही बाब मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईचे निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली.
मतदान केंद्रावर (Assembly election 2024) मोबाइल नेण्यास परवानगी दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बंदी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतदान करतानाच्या ध्वनिचित्रफिती तयार केल्या जाऊ शकतात किंवा त्याकरीता एखाद्या उमेदवाराकडून मतदारांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यामुळे मोबाइल बंदीची सक्ती करण्यात आली आहे.