मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या कारवर दगडफेक झाली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसात वाजता घडलेल्या या घटनेत सोनावणे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
वाळूज परिसरात लांजी गावाजवळ सोनावणे यांच्या कारवर एक अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. आरोपींना पकडण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या आहेत.
माजी गृहमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला
याआधी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवही हल्ला करण्याची घटना समोर आली. कारवर केलेल्या दगडफेकीमुळे अनिल देशमुख जखमी झाले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला कोणी केला याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर गृहमंत्री अनिल काटोल नागपूर शहरात परतत होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. अनिल देशमुख मागे बसले होते. यावेळी खिडकीची काच उघडी होती.यामुळे दगड त्यांच्या डोक्यावर लागला.