मुंबई: बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे स्वत:ला फिट ठेवणे हे मोठे आव्हान ठरले आहे. खासकरून सध्याच्या लाईफस्टाईलमुळे आरोग्याचा(Health) धोका वाढत चालला आहे. खासकरून हृदयाच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. याचे खास करून शारिरीक हालचाल कमी होणे. ही काही एका देशाची नव्हे तर जगाची समस्या बनली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार शारिरीक हालचाल कमी होणे हे जगभरातील लोकांच्या मृत्यूचे चौथे कारण बनत आहे. या कारणामुळे दरवर्षी ३.२ मिलियन लोकांचा मृत्यू होतो. कोरोना कालावधीत ही समस्या अधिक वाढली होती. कारण या दरम्यान शारिरीक हालचाल करणे शक्य नव्हते.
शारिरीक हालचाल राखण्यासाठी दररोज दहा हजार स्टेप्स चालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र हे खरंच गरजेचे आहे का? अभ्यासानुसार एका दिवसांत ३८६७ पावले चालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हृदयासंबंधित आजारांचा धोका टळतो.
टीप – वरील लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही सल्ला अंमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.