
नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर नागपुरात सध्या एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या नागपुरच्या खाजगी रुग्णालयात अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलिसांची मोठी फौज त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण उसळून आलं आहे. तसेच त्यांनी नेमकं काय घडलं? याचीही माहिती दिली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election 2024) प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावल्या. बुधवारी राज्यभरातील २८८ जागांवर मतदान होत आहे, त्याआधी ४८ तास ...
नेमकं कसं घडलं?
उज्वल भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (सोमवारी) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस होता. अनिल देशमुख नरखेडमध्ये त्यांच्या मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी गेले होते. ही सभा संपल्यानंतर रात्री ८.१५ वाजता ते कटोलकडे जात असताना बेलफाटा या ठिकाणी अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. बेलफाटा जवळील रस्त्याला एक वळण आहे. त्यामुळे आमच्या गाडीची गती कमी होती. यावेळी चार अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली आणि दगडफेक सुरु केली.
#BREAKING 🚨 | Former Home Minister Anil Deshmukh was injured in a stone-pelting attack on Katol-Jalalkheda Road after a rally. His vehicle was damaged, and he received emergency treatment.#AnilDeshmukh #AttackonAnilDeshmukh #Katoljalalkhedaroad #attack pic.twitter.com/5WxQrMxGU0
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) November 18, 2024
ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर अनिल देशमुख बसले होते. यावेळी हल्लेखोरांनी एक मोठा दगड गाडीच्या समोरील काचावर फेकला. यामुळे काचेला तडा गेला. त्यातच अजून एका हल्लेखोराने एक दगड थेट देशमुख यांच्या दिशेने मारला. आणि तो दगड त्यांच्या कपाळावर लागला आणि त्यांना गंभीर जखम झाली. यानंतर आम्ही तातडीने त्यांना दुसऱ्या गाडीतून कटोल ग्रामीण रुग्णालयात नेले. यादरम्यान, रेल्वे फाटक बंद असल्याने थोडा वेळ उशीर झाला. पण प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलवण्यात आले.