मुंबई: जीमेलचे(Gmail) स्टोरेज फुल्ल होणे ही अतिशय सामान्य बाब आबे. प्रत्येक युजरला गुगलकडून केवळ १५ जीबी स्टोरेज मोफत मिळते. हे स्टोरेज ईमेल अॅटॅचमेंट, मोठ्या फाईल्स आणि नको असलेल्या ईमेल्समुळे लवकर भरून जाते. जेव्हा स्टोरेज भरलेले असते तेव्हा नवा ईमेल पाठवण्यास आणि ईमेल येण्यास त्रास होतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमचा जीमेल मिनिटांत खाली करू शकता.
गरज नसलेले इमेल्स डिलिट करा
तुमच्या जीमेलमध्ये अनेकदा असे ईमेल असतात जे काही कामाचे नसतात. असे विना गरजेचे ईमेल डिलिट करा.
ट्रॅश आणि स्पॅम फोल्डर साफ करा
स्पॅम आणि ट्रॅश फोल्डरमध्ये असे ईमेल्स असतात जे तुम्ही डिलिट केलेले असतात अथवा स्पॅम असतात. यांना वेळोवेळी डिलिट करत जा यामुळे स्टोरेज रिकामी होईल.
लेबल आणि फोल्डर व्यवस्थित करा
जीमेलला चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आपल्या ईमेलला लेबल आणि फोल्डरमध्ये व्यवस्थित करा. यामुळे केवळ स्टोरेजच(Gmail) वाचत नाही तर स्पीडही वाढतो.
नको असलेले ईमेल्स अनसबस्क्राईब करा
जे ईमेल तुम्ही वापरत नाहीत ते अनसबस्क्राईब करा. यामुळे इनबॉक्स साफ राहील तसेच फालतू ईमेल्स येणार नाहीत.