Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मतदान केंद्रांच्या ठिकाणी असणार पाळणाघर

मतदान केंद्रांच्या ठिकाणी असणार पाळणाघर

पुणे: लहान मुले घेऊन सुद्धा मतदानाला जाता येणार आहे. कारण मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाळणाघरांची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर असेल. मतदान करण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढा वेळ पाळणाघरात अंगणवाडी सेविकेने दिलेल्या खेळण्यांसोबत बाळे खेळू शकणार आहेत. तर अंगणवाडी सेविकांनी मात्र विनामोबदला काम करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली.




महिला मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीतजास्त मतदान करावे, महिलांचा मतदानातील टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाचहून मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पाळणाघर करण्याचे नियोजन केले. सुमारे दोन हजार १०० ठिकाणी पाळणाघर असतील. पाळणाघरात पिण्याचे पाणी, खेळण्यांबरोबरच बाळाला आवश्यकतेनुसार पोषक आहारदेखील उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बाळाला घेऊन मतदानाला आल्यानंतर अंगणवाडी ताईंकडे बाळ सोपवून महिला मतदार निश्चितपणे मतदान करू शकतात, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment