गुजरात : गुजरातमधील पाटण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटण जिल्ह्यातील धारपूर येथील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वसतिगृहात शनिवारी रात्री ‘एमबीबीएस’च्या १८ वर्षीय विद्यार्थ्यांचा रॅगिंगदरम्यान तीन तास उभे केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयाने या घटनेचा तपास सुरू केला आहे. रॅगिंगप्रकरणात जे वरिष्ठ विद्यार्थी दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सीनिअर विद्यार्थ्यांनी केलेल्या रॅगिंगदरम्यान तीन तास उभे राहिल्याने अनिल मेथानिया नावाचा विद्यार्थी बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हार्दिक शहा यांनी दिली. विद्यार्थी कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्याला मृत घोषित करण्यात आले.
Mumbai Dry Day : तळीरामांची होणार तडफड! मुंबईत चार दिवस ड्राय डे
मेडिकलच्या प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले की, सात-आठ सीनिअर विद्याथ्यांनी ज्युनिअर गटाला सुमारे तीन तास उभे राहण्यास भाग पाडले आणि एक-एक करून आपली ओळख करून दिली. ‘त्यांनी आम्हाला उभे राहायला भाग पाडले आणि आम्हाला चिडचिड करू नका असे सांगितले.आम्ही सगळे ३ तास उभे होतो त्यावेळी आमच्यासोबत उभा असलेला एक विद्यार्थी बेशुद्ध पडला.
महाविद्यालय आणि सरकारकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा अनिलचा चुलत भाऊ धर्मेंद्र मेथानिया याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.