Friday, February 14, 2025
Homeमहत्वाची बातमीVinod Tawade : अदानींचा विकास काँग्रेसनेच केला; विनोद तावडेंनी राहुल गांधींना पुराव्यांसकट...

Vinod Tawade : अदानींचा विकास काँग्रेसनेच केला; विनोद तावडेंनी राहुल गांधींना पुराव्यांसकट तोंडावर पाडले..

मुंबई : भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे नाते जोडले जात आहे, पण ते खरे नाही. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, अशा शब्दांत पलटवार करत भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

दिवंगत राजीव गांधी यांच्या काळातच आपली ग्रोथ झाल्याचे गौतम अदानींनी स्वत:च सांगितले आहे. काँग्रेसच्या काळातच त्यांचा सर्वात जास्त विकास झाला. तर अलिकडेच राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत ४६ हजार कोटी रुपयांचा सोलार प्रोजेक्ट अदानी यांच्याबरोबर करण्यात आला. अशोक गेहलोत यांनी अदानींना जमिनी दिल्या त्यावेळी अदानी कुणाचे होते? काँग्रेसने अदानींसोबत तेलंगणामध्ये १२ हजार ४०० कोटी रुपयांचा करार केला, तेव्हा हे अदानी कोणाचे होते? युपीए सरकारच्या काळातच अदानी समुहाचा विकास झाला. काँग्रेसच्या काळातच अदानी यांचा देशात आणि परदेशात विकास झाला. २०१४ सालच्या आधीचे आणि नंतर अदानी समुहाला मिळालेल्या काही प्रकल्पांची यादी आहे. पण धारावीत जे लोक राहतात, त्या सर्वांना नवी आणि पक्की घरं मिळणार आहेत. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टीही मिळणार आहेत. पण धारावीकरांनी कायम झोपडपट्टीत राहावे असे राहुल गांधी यांची इच्छा आहे. शेख यांना कंत्राट मिळाले नाही, म्हणून एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है, असे म्हणायचे का, अशा शब्दांत विनोद तावडेंनी काँग्रेसला सुनावले.

काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्यावरून भाजपावर टीका केली होती. अदानी समुहाला मुंबईतील धारावीची जमीन हवी आहे. त्यासाठी भाजपाकडून एक है तो सेफ है चा नारा दिला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. इतकेच नव्हे तर धारावीचा नकाशा, नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे एक पोस्टर दाखवत धारावीसाठी त्यांची एक लाख कोटींची डीलही झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांना विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

आज सकाळी राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत एक सेफ काढली. या सेफ मधून त्यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो दखवले. असे फोटो जर काढायचेच होते तर आमच्याकडेही काही फोटो आहेत, असे सांगत तावडें यांनी गौतम अदानी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवले. तसेच अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना, काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याबरोबर, तेलंगणातील मुख्यमंत्री यांच्या बरोबर, हरियाणातील २०१४च्या आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे असे अनेक फोटो आहेत. काँग्रेस आणि गौतम अदानी यांचे नाते किती जुने आहे, तेही सांगू शकतो, असा टोलाही तावडेंनी (Vinod Tawade) लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -