मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) आठवडा भरावर आली आहे. या काळात प्रशासनाकडून (Administration) आचारसंहितेप्रमाणे (Code of Conduct) आणखी काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मुंबईत चार दिवस ड्राय-डे (Mumbai Dry Day) ची घोषणा केली आहे.
कोणत्या दिवशी असणार ड्राय डे?
निवडणूक आयोगाने (Election Commision) जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, १८ नोव्हेंबर रोजी मुंबईसह इतर शहरांमध्ये संध्याकाळी ६ नंतर मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत संपूर्ण ड्राय डे राहणार आहे. २० नोव्हेंबरला मुंबईत मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करणार असल्याने संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. (Mumbai Dry Day)