संतप्त नागरिकांकडून रास्तारोको आंदोलन
वाशिम : वाशिममध्ये (Washim Accident) एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांना रास्तारोको आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज वाशिमहून हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने एका दुचाकीला जोरदार धडक देत एसटी बसने दुचाकीला ५० फुटापर्यंत फरफटत नेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून यात एक स्त्री व पुरुषाचा समावेश आहे.
आचारसंहिता भंगाच्या ७,७८४ तक्रारी निकाली; ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्तारोको आंदोलन सुरु केले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली. (Washim Accident)