अलिबाग : नागरिकांना रक्कम अधिक देण्याचे आमिष दाखवत नागावमधील एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याने आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झालेल्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलिसांनी तिला अटक केली असून, अलिबागच्या न्यायालयाने तिला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी धिरेंद्र सिंग यांच्या तक्रारीनुसार अस्मिता पाटील असे या फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
CBSC Syllabus : दहावी-बारावीचा अभ्यासक्रम १५ टक्क्यांनी कमी!
५० हजार रुपये गुंतवणूक केल्यास सहा दिवसात २५ टक्के नफा, एक लाख गुंतवणूक केल्यास १७ दिवसात ३० टक्के, सात लाख गुंतवणूक केल्यास २० दिवसांत ३० टक्के अशा वेगवेगळ्या सवलती देऊन कमी कालावधीत व्याजदरापेक्षा जास्त रक्कम परतावा देण्याचे आमिष तिने दाखवून लाखो रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला तिने विश्वास संपादन केला. तिच्या या आमिषाला बळी पडत सिंग यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक त्यांच्याकडे केली; परंतू त्यानंतर तिच्याकडून सदर रक्कम परत देण्यास टाळाटाळ होऊ लागली. सात लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सिंग यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली.