नवी दिल्ली : मेट्रोमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळत आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRCL) मॅनेजर (भूमी) आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती जारी केली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून ३ डिसेंबर अंतिम तारीख असणार आहे. दिल्ली मेट्रोत काम करणारे इच्छुक उमेदवार delhimetro.com या वेबसाईटवरून अर्ज करू शकणार आहेत.
Nayanthara News : फक्त ३ सेकंदांच्या व्हिडीओसाठी ठोकला १० कोटी रुपयांचा दावा
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यालयातून बी.बी.ई / बी.टेक सिव्हिल डिग्री असणे गरजेचे आहे. तसेच यातून किमान ६० टक्के असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा आणि वेतन
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी ५५ वर्ष ते ६२ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मॅनेजर पदासाठी ८७,८०० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी ६८,३०० रुपये पगार मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
दिल्ली मेट्रोतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर मेडिकल फिटनेस परीक्षा द्यावी लागणार आहे. या नोकरीसाठी मुलाखत डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी दिल्ली मेट्रोच्या साइटवर जाऊन फॉर्म डाउनलोड करावा. त्यानंतर हा अर्ज भरुन जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट (एचआर), दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, भारखंभा, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.