शिक्षण आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण
पुणे : विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) आठवडा भरावर येऊन ठेपली आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शालेय शिक्षक देखील निवडणुकीच्या कामात व्यस्त होतात. त्यामुळे १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यातील शाळांना सुट्टी देण्याबाबतची माहिती समोर आली होती. मात्र याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्यावर शिक्षण आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे शाळा- महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी!
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाचे (Education Department) उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असून कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली आहे. त्यामुळे, ज्या शाळेत एकही शिक्षक उपलब्ध नसल्यास संबंधित शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले.