Monday, February 17, 2025
Homeमहत्वाची बातमीमविआला धडा शिकवण्याची वेळ आली- जे.पी.नड्डा

मविआला धडा शिकवण्याची वेळ आली- जे.पी.नड्डा

नाशिक : राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधी, विभाजनवादी शहरी नक्षलवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. अशा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आता चांगला धडा शिकवीण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी येथे केले.

भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर आयोजित विशेष निमंत्रितांसाठी प्रज्ञावंत मेळाव्यात मंत्री नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत विकसित महाराष्ट्र या विषयावर श्री तेज गार्डन व बँक्वेट हॉल येथे मार्ग दर्शन केले. व्यासपीठावर माजी मंत्री भारती पवार, आ.देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदीप पेशकर, गुजरत आ.अमित ठाकर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हा ध्यक्ष शंकर वाघ, सुनिल बच्छाव, आशीष नहार, प्रकाश लोंढे, रंजन ठाकरे, गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

नड्डा यांनी अभियंते, सनदी लेखापाल, डॉक्टर आदी विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले. नड्डा यांनी देशातील विभाजनवादी शक्तींना शहरी नक्षलवादी टोळीकडून कशा प्रकारे सहाय्य मिळत आहे याचे विस्ताराने विवेचन केले. महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची भूमी आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोदी सरकारचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे. मराठी सारख्या वैभवशाली परंपरा असलेल्या भाषेतील संंतांनी, साहित्यिकांनी भारताच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेची सामान्य माणसाला ओळख करून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

कार्यक्रमास व्यापारी, उद्योग व्यवसायिक, राजस्थानातून आलेले व्यवसायिक, चित्रपट, वैद्यकीय, कायदा व सुव्यवस्था क्षेत्रातील ज्येष्ठ विधीज्ञ, माजी सैनिक, शिक्षक, अभियंता, जैन समाजातील श्रेष्ठी उपस्थीत होते.

पाचव्या क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था

जगात भारतााची पाचव्यां क्रमांकाची मजबूत अर्थव्यवस्था बनली आहे, लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. या उलट १० वर्षांपूर्वी देशात घराणेशाही, भ्रष्टाचार याला प्रतिष्ठा मिळाली होती. राजकीय स्वार्थासाठी धर्म, राज्य, भाषा यांच्या आधारे जनतेला एकमेकांविरुद्ध झुंजवत ठेवले जात होते. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर राजकारणाला विकासाची, उत्तरदायित्वाची, गरिबांच्या सेवेची भाषा केली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने आपल्या कामगिरीचे प्रगती पुस्तक वारंवार जनतेपुढे ठेवलेच पाहिजे आपल्या प्रगती पुस्तकाबरोबरच पंतप्रधानांनी भविष्यकाळात देशाची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट करणारी धोरणेही जनतेपुढे नियमित रूपाने मांडली. यामुळे देशाची राजकीय, संस्कृती आमूलाग्र बदलली. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ नावाची नवी राजकीय संस्कृती जन्माला आली असे नड्डा म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -