Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

UP Accident : लग्नाची मिरवणूक जीवावर बेतली! अपघातात वधू-वरासह ७ जणांचा मृत्यू

UP Accident : लग्नाची मिरवणूक जीवावर बेतली! अपघातात वधू-वरासह ७ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP Accident) बिजनौर येथे झालेल्या भीषण अपघातात वधू-वरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर लग्नाची मिरवणूक (Marriage Function) वधूसोबत परतत असताना हा भीषण अपघात घडला. यानंतर सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब ऑटोने बिजनौर येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. धामापूर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वर आणि कुटुंबातील सहा सदस्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान टेम्पो चालकाचाही मृत्यू झाला.



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल


बिजनौर जिल्ह्यातील रस्ते अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातामधील इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment