नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील अनेक बँकांवर कारवाई (RBI Action) करण्यात येते. आतापर्यंत आरबीआयने एसबीआय, पीएनबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी अशा अनेक मोठ्या बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. आता आरबीआयने विजयवाडा दुर्गा को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने १२ नोव्हेंबर पासून बँकेचे सर्व काम बंद केले आहे.तसेच आंध्र प्रदेशातील कमिश्नर फॉर को-ऑपरेशन आणि को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या बँक बंद करण्याचे व लिक्विडेटरची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत.
Share Market: सेन्सेक्स, निफ्टीत किंचित वाढ, पण तज्ज्ञांनी दिला मंदीचा इशारा
५ लाखांपर्यंत रक्कम सुरक्षित
दुर्गा को-ऑपरेटिव्ह बँकेचे लिक्विडेशन झाल्यानंतर बँकेच्या ९५.८ टक्के ठेवीदारांना ठेवींवर विमा आणि क्रेडिट गँरंटी कॉर्पोरेशनकडून ५ लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत वीमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार आहे.