Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

Maharashtra Assembly Election: निवडणूक प्रचारादरम्यान गोविंदाची तब्येत बिघडली,रोड शो मध्येच सोडून मुंबईत परतला

मुंबई: बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत होता. खरंतर अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. या कारणामुळे त्याचे ऑपरेशन झाले होते. आता अभिनेता ठीक होऊन फिल्डमध्ये परतला आहे. गोविंदाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. खरंतर गोविंदा महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतील(Maharashtra Assembly Election) एका रोड शोमध्ये पोहोचला होता. येथे त्याला अचानक छातीत दुखू लागले. यामुळे तो मुंबईत परतला आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



रोड शोसाठी जळगावला पोहोचला होता गोविंद


खरंतर माजी खासदार असलेला गोविंदने नुकताच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यामुळे ते शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करत होा. नुकताच तो जळगावात एका रोड शोसाठी पोहोचला होता. यामुळे त्याने पक्षाचा उत्साह वाढवला. मात्र अचानक अभिनेत्याची तब्येत बिघडली.



तब्येत बिघडल्यानंतर मुंबईत परतला गोविंदा


गोविंदाला अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रोड शो मध्येच सोडावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता मुंबईत परतला आहे. या रोड शो दरम्यान गोविंदाने मतदारांना आवाहन केले की त्यांनी राज्यात महायुतीला मतदान करावे.

Comments
Add Comment