मुंबई: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला(IND vs SA) ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-१ असे हरवले. चौथा सामना शुक्रवारी जोहान्सबर्गमध्ये झाला. यात भारताने १३५ धावांनी विजय मिळवला.
आधी भारतीय संघाने १ विकेट गमाव २८३ धावा केल्या. या दरम्यान संजू सॅमसन आणि तिलक वर्माने शानदार शतक ठोकले. तर आफ्रिकेच्या संघाला १४८ धावाच करता आल्या. संजू सॅमसनने ५६ बॉलमध्ये १०९ धावांची सुंदर खेळी केली. या दरम्यान त्याने ९ षटकार आणि ६ चौकार लगावले. या खेळीदरम्यान अपघात झाला.
This is so disheartening, Sanju Samson six hits a fan and your heart will melt looking at her. Hope she recovers fast and thank God that it did not hit her head. #SanjuSamson #INDvSA pic.twitter.com/rmAX8z0zjv
— Mufa Kohli (@MufaKohli) November 15, 2024
संजूने आपल्या खेळीच्या १०व्या ओव्हरच्या सुरूवातीच्या २ बॉलमध्ये २ षटकार ठोकले. ट्रिस्टनन स्टब्सच्या बॉलवर दुसरा षटकार एका महिलेच्या गालावरच बसला. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. यात बॉल सरळ महिलेला लागला नाही. बॉलचा टप्पा जमिनीवर बसला त्यानंतर चो महिलेच्या गालाला लागला.
Sanju Samson immediately apologized to the fan after his six accidentally struck her
pic.twitter.com/7mACXAxquw— ICT Fan (@Delphy06) November 15, 2024
बॉल लागल्यानंतर महिला रडायला लागली. त्यानंतर मैदानातून संजूने हात उचलून महिलेची माफी मागितली. दरम्यान, महिलेची स्थिती कशी आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.