Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीश्रध्दा-संस्कृती

Vastu Tips: घरात या २ पक्ष्यांचे फोटो लावणे मानले जाते शुभ, पैशाने भरून जाईल घर

Vastu Tips: घरात या २ पक्ष्यांचे फोटो लावणे मानले जाते शुभ, पैशाने भरून जाईल घर

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात जर पैशांची तंगी जाणवत असेल तर काही पक्ष्यांचे फोटो लावणे फायदेशीर ठरते. वास्तुशास्त्रानुसार यातील काही पक्ष्यांचे फोटो जर तुमच्या घरात लावले असतील तर यामुळे वातावरण सकारात्मक राहते.


वास्तुशास्त्रानुसार घरात असा फोटो लावल्यामुळे घरात सकारात्मकता येते. नकारात्मकतेचा नाश होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचा फोटो लावणे अतिशय शुभ असते. हा फोटो सुख-शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.


घरात लावलेला मोराचा फोटो वास्तुदोष संपवण्यास मदत करतो. दरम्यान, नेहमी पूर्व दिशेला हा फोटो लावला पाहिजे. घराच्या पूर्व दिशेला मोराचा फोटो लावल्यास कुटुंबातील आर्थिक समस्या संपतात. तसेच आर्थिक त्रास उद्भवत नाही.


वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात नीलकंठचा फोटो लावत असाल तर हे शुभ मानले गेले आहे. यामुळे घराची भरभराट होते. तसेच घरात धन-संपत्तीची कमतरता राहत नाही.


घरात नीळकंठचा फोटो लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढत नाही. यामुळे तणावपूर्ण वातावरण संपून जाते. यामुळे नेहमी पूर्व अथवा उत्तर-पूर्व दिशेला लावला पाहिजे. घरात काल्पनिक फीनिक्स पक्षीचा फोटो लावणेही अतिशय शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मकता येते. घरात नेहमी आनंदीआनंद राहतो.

Comments
Add Comment