
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल आठवडा भरावर येवून ठेपला असताना यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान (Voting) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा- महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणं शक्य नसल्यामुळे, प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा(Assembly Election) जोरदार धुरळा उडवला जात आहे. सर्वच राजकीय पक्ष सभांवर सभा घेत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात ...
मिळालेल्या माहितीनुसार, १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असणार आहे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी जारी केले आहेत. त्यानुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे सांगितले आहे.