मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका(IND vs SA) यांच्यातील चौथा टी-२० सामना खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. यावेळेस भारतीय संघ ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ हा सामना जिंकत ३-१ने मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
तर दुसरीकडे एडेन मार्करमची दक्षिण आफ्रिका चौथा सामना जिंकत मालिकेत २-२ ची बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. प्लेईंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार घ्या जाणून…
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये होणार बदल
पहिल्या सामन्यातील शतकानंतर भारताचा सलमीवीर संजू सॅमसन सातत्याने संघर्ष करत आहे. यानंतर संजू सॅमसन सातत्याने दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. याशिवाय रिंकु सिंहची बॅट शांत आहे. आतापर्यंत रिंकु सिंहने आपला फिनिशरचा रोल निभावण्यात अयशस्वी ठरला आहे. दरम्यान, दोन्ही खेळाडूंशिवाय इतर खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा फ्लॉप ठरला मात्र तिसऱ्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक ठोकले.
भारताचे संभाव्य प्लेईंग ११
संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, रमनदीप सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह आणि आवेश खान.
द. आफ्रिकेचे संभाव्य प्लेईंग ११
रयान रिकेल्टन, रीज़ा हेंड्रिक्स, एडेन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन, पैट्रिक क्रूगर/लूथो सिपाम्ला, मार्को जेनसन, केशव महाराज, ओटनील बार्टमैन आणि गेराल्ड कोएत्ज़ी.