Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीGarlic Price Hike : लसणाची फोडणी महागली! प्रति किलोला मोजावे लागतात 'इतके'...

Garlic Price Hike : लसणाची फोडणी महागली! प्रति किलोला मोजावे लागतात ‘इतके’ रुपये

पुणे : अन्नपदार्थांना खमंग, स्वादिष्ट आणि रूचकर चव देणाऱ्या लसणाच्या उत्पादनात घट (Decrease Garlic production) झाल्याने पुण्यातील स्थानिक बाजारपेठांमधील आवकही घटली आहे. बाजारात लसणाचा तुटवडा जाणवू लागला असून मागणी जास्त असल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात लसणाचे दर गगनाला भिडले (Garlic Price Hike) आहेत. किरकोळ बाजारात लसणाचे किलोचे दर ४०० रुपयांवर पोहोचले असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले (inflation) असल्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब झाल्याचे चित्र आहे.

मार्केट यार्डातील बाजारात रोज ५ ते ७ गाड्यांची आवक होत आहे. दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बाजारात नवीन लसणाची आवक सुरू होईल. त्यानंतर वाढलेले दर कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यापारी समीर रायकर यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यात वातावरण बदलाचा शेतीला फटका

देशात लसणाचा तुटवडा जाणवत असतानाच काही प्रमाणात आफगाणिस्तानमधून देशात लसणाची आवक होत आहे. तेथून येणारा लसूण मुंबई, दिल्लीसह दक्षिण भारतातील राज्यात जात आहे. या लसणामुळे काही प्रमाणात दरवाढीला आळा बसला आहे, असेही व्यापार्यांकडून नमूद करण्यात आले. (Garlic Price Hike)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -