BKC Fire : बीकेसी मेट्रो स्थानकात भीषण आग!

  136

मुंबई : मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात (BKC Metro Station) आज दुपारी १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास भीषण (Fire News) आग लागली. या आगीत मेट्रोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बीकेसी मेट्रोच काम सुरू असताना वेल्डिंगमुळे खाली ठेवलेल्या लाकडी समानाने पेट घेतल्यामुळे ही घटना घडली. ४०-५० फूट खाली आग लागली असून या ठिकाणी मेट्रो स्थानकाचे काम सुरू होते १०० बाय ६० फूट च्या भागात हे काम सुरू होते या ठिकाणी लाकडं आणि इतर साहित्य असलेल्या भागात ही लागली. त्यामुळे संपूर्ण मेट्रो स्टेशनवर धूराचे लोट पसरले होते.


आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब दाखल झाले. तसेच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन्स थांबवून मेट्रो स्टेशनमधील (Mumbai Metro)  सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या आगीचा फटका मेट्रो सेवेला बसल्यामुळे बीकेसी स्थानकावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. आतापर्यंत मेट्रोच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग विझवण्यात आली.


दरम्यान, आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतर  दुपारी २ बाजून ४५ मिनिटांनी परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या. तसेच या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसून प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मेट्रोने म्हटले आहे. (BKC Fire)


Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई