Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीAssembly election : चंद्रपूरमध्ये आज अमित शाहांची़ जाहीर सभा

Assembly election : चंद्रपूरमध्ये आज अमित शाहांची़ जाहीर सभा

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार,चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्यासह क्षेत्रातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी १५ नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह(amit shah) यांची जाहीर सभा चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंड येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

देशाचे सर्वांत यशस्वी आणि दमदार गृहमंत्री म्हणून अमित शाह यांची ओळख आहे. देशातील गुन्हेगारांवर वचक मिळवून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अमित शाह यांना यश आले आहे. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर दुपारी 4 वाजता अमित शाह चंद्रपूरकरांशी संवाद साधतील.

येत्या २० नोव्हेंबरला राज्यभरात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते जोरदार सभा घेत आहेत. २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -