Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा(Assembly Election) जोरदार धुरळा उडवला जात आहे. सर्वच राजकीय पक्ष सभांवर सभा घेत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावत आहे.


राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विशेष पाऊल उचलले जात आहे. निवडणुकीसाठी मध्य रेल्वेकडून रात्रीच्या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेल या दरम्यान धीम्या गतीवर २० नोव्हेंबरला पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या लोकल गाड्या सोडल्या जाणार आहेत. यामुळे निवडणुकीचे कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.



असे असणार वेळापत्रक


२० नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता गाड्या सुटतील


सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल(डाऊन मार्गावर)
कल्याण-सीएसएमटी, पनवेल - सीएसएमटी(अप मार्गावर)



डाऊन मार्ग


सीएसएमटी-कल्याण- १.१०, २.३०
सीएसएमटी - पनवेल - १.४०, २.५०



अप मार्ग


कल्याण-सीएसएमटी- १.००, २.००
पनवेल - सीएसएमटी - १.००, २.३०

Comments
Add Comment