मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे सर्वोत्तम कार्यापैकी एक असते. दान करणारे नेहमी खुश राहतात. दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही धन-दौलतीची कमतरता राहत नाही. याउलट ते अधिक धनवान होतात.
आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीने गरीब आणि गरजवंताच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. अशा लोकांना भोजन, कपडे, औषधे या गोष्टी देण्यावर खर्च करण्यात अजिबात विचार करू नये.
तर दुसरीकडे आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने धर्म-कर्माशी संबंधित कार्यासाठी पैसा खर्च करण्याआधी विचार केला नाही पाहिजे. जी व्यक्ती धार्मिक गोष्टींसाठी दान करते ती व्यक्ती नेहमी धनवान राहते. अशी व्यक्ती नेहमी आनंदी राहते.
आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीने सामाजिक कार्यात पैसे खर्च करताना कंजुसपणा करू नये. समाजाच्या प्रती प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते. योग्य ठिकाणी पैसे खर्च करणे फायदेशीर असते.
दरम्यान, चाणक्यने हा ही सल्ला दिला की व्यक्तीला नेहमी दान आपल्या कुवतीनुसारच केले पाहिजे.