कणकवली : सिंधुदुर्गमध्ये काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा (Maharashtra Election Sabha) झाली. या सभेनंतर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखासह पदाधिका-यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत
सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी रमदुल म्हणाले की, आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचे कार्य करत आहेत, ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरु आहे त्याविरोधात नितेश राणे आहेत. कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी दिली.
Devendra Fadnavis : ‘त्यांच्याजवळील विषय संपले,’ म्हणून आता त्यांची रडारड
ते पुढे म्हणाले की, मी सुरुवातीपासूनच राणे कुटुंबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो. २००८ पासून स्वाभिमान संघटनेचे कार्य मी करत होतो. या ठिकाणी गेली १४ वर्ष राणे कुटुंबाशी मी एकनिष्ठ होतो. काही गैरसमज झाल्यामुळे मी वर्षभर पक्षापासून नितेश राणेंसोबत दूर गेलो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा नितेश राणे यांनी माझ्याशी सतत संपर्क ठेवला. माझ्या सुखदुःखामध्ये साहेब नेहमी विचारपूस करायचे, ईद सणानिमित्त साहेब आशीर्वाद द्यायचे, धन्यवाद द्यायचे, फोन करून शुभेच्छा द्यायचे, माझ्यावर वैयक्तिक संकट आले असताना सुद्धा साहेबांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आज साहेबांची असलेली निष्ठा साहेबांवरती असलेल्या प्रेम आणि या निवडणुकीमध्ये साहेबांच्या निष्ठेमुळे प्रेमामुळेच या ठिकाणी आणि विकास कामांचा जोर साहेबांचा असल्यामुळे मी आज राणे कुटुंबामध्ये पुन्हा एकदा स्वगृही येण्याचा मी या ठिकाणी आज प्रयत्न केलेला आहे, असे ते म्हणाले.
कोकणातील मुस्लिम बांधवांना सर्वात जास्त आधार राणेसाहेबांचाच
कोकणातील मुस्लिम बांधवांना सर्वात जास्त आधार हा राणेसाहेबांनी दिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांचा तो कायम आहे यामुळे राणे साहेबांची भूमिका ही पूर्ण मुस्लिम समाजाच्या विरोधात नसल्याने साहेबांना त्याची आम्हाला समजूत खात्री घातलेली आहे, त्यामुळे नक्कीच मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्येने साहेबांसोबत आज आहे, असे रमदुल यांनी सांगितले.