Thursday, July 10, 2025

Ghulam Ahmad Mir : “घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची अजब घोषणा

Ghulam Ahmad Mir : “घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची अजब घोषणा

भाजपाकडून जोरदार टीका


रांची : काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यावर आम्ही सर्व नागरिकांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर देऊ. घुसखोरांनाही त्यात सामावून घेऊ. झारखंडच्या सर्व नागरिकांना सामावून घेऊ, अशी अजब घोषणा (Strange announcement) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि झारखंड काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir) यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.


मीर यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने जोरदार टिका केली. हे काँग्रेसचे तुष्टीकरण्याचे आणि ध्रुवीकरणाचे राजकारण आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून अशाच प्रकारचे राजकारण करत आले आहेत, असे भाजपाचा आरोप आहे.


झारखंडमधील बेरमो विधानसभा मतदारसंघातील चंद्रपुरा भागात गुरुवारी काँग्रेसची एक प्रचारफेरी पार पडली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर (Ghulam Ahmad Mir) म्हणाले, आम्ही जनतेला आश्वासन दिले आहे की “जर आमचं सरकार आलश् तर आम्ही १ डिसेंबरपासून सर्वांसाठी ४५० रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ. ही योजना सामान्य नागरिकांसाठी असेल. तुम्ही हिंदू असा अथवा मुसलमान किंवा घुसखोर… सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. झारखंडच्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही.

Comments
Add Comment