Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mhada Lottery : म्हाडा घराच्या अर्जासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करु शकणार अर्ज!

पुणे : मुंबई-पुणे सारख्या शहरात सर्वसामान्यांना हक्काचे घर घेणं परवडत नसल्यामुळे म्हाडाकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery) वाट पाहावी लागते. अशातच म्हाडाने पुणे (Pune) गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे ६२९४ घरांच्या सोडतीची घोषणा केली. तर आता यासाठी लागणाऱ्या अर्जाची देखील मुदतवाढ करण्यात आली आहे.


म्हाडा पुणे मंडळातर्फे (Mhada Pune Mandal) पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीसीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीमधीलएमेक घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. विविध योजनांमधील घरांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. १० ऑक्टोबरपासून या घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. यासाठी नागरिक आता १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करु शकणार आहेत. त्यानंतर १२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाईल असून १३ डिसेंबर रोजी अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. नागरिकांची घरांसाठी वाढती मागणी पाहाता हा निर्णय घेण्यात आला आहे.



यामध्ये २,३४० घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये ९३ घरे म्हाडा योजनेअंतर्गत आहेत. तर ४१८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Aawas Yojana) तयार करण्यात आली आहे. (Mhada Lottery)

Comments
Add Comment