मुंबई: भारतीय संघाचे अधिकतर खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्क्वॉडसोबत ऑस्ट्रेलियाला गेला नाही. तर आज ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माने चिल्ड्रन डे(Childrens Day) सेलिब्रेट केला. दोन्ही कपलने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.
सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा बाल दिवस साजरा करण्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माने बाल दिवसानिमित्त मॅगी खाऊ घातली. मात्र जोडप्याने आपल्या मुलांना जी मॅगी खाऊ घातली ती हेल्दी आहे.
बालदिवसाचा मेन्यू – स्माईल, गिगल आणि मिलेट न्यूडल्स
सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या मुलांसह बालदिवस साजरा करण्याचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोला विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरी लावली आहे. सोबतच फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे, बाल दिवस(Childrens Day) मेन्यू – स्माईल, गिगल आणि मिलेट न्यूडल्स.आता सोशल मिडिया युजर्स अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम स्टोरीवर सातत्याने कमेंट्स करत प्रतिक्रिया दिली आहे.