मुंबई: जुलै महिन्यात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाकडून रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता लोक सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे(BSNL) प्लान्स सर्च करत आहेत. हे पाहता बीएसएनएलच्या स्वस्त दररोज १ जीबी डेटाच्या प्लान्सची माहिती तुम्हाला देत आहोत. हा प्लान जिओच्या तुलनेत अर्ध्या किंमतीला आहे.
आम्ही बोलत आहोत बीएसएनएलच्या ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या रिचार्ज प्लानबद्दल. बीएसएनएल आपल्या ग्राहकांना २९८ रूपयांच्या या रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंग आणि डेटा दोघांचेही फायदे देतो. या प्लानची व्हॅलिडिटी संपूर्ण २ महिन्यांची मिळत नाही. मात्र ५२ दिवसांसाठी मिळणारा हा रिचार्ज प्लान स्वस्त पर्याय आहे.
२५० रूपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNLचा रिचार्ज प्लान, ४५ दिवसांपर्यंत अनलिमिटेड डेटा,कॉलिंग
५२ दिवसांची व्हॅलिडिटी
अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटासह बीएसएनएलचा(BSNL) हा प्रीपेड प्लान ५२ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. पॅकमध्ये लोकल आणि एसटिडीवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यात दर दिवसाला १ जीबी डेटासह दररोज १०० एसएमएसचीही सुविधा मिळते.