Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

BSNL ने Jio-Airtel ला टाकले मागे, लाँच केली भारतात पहिली Satellite-to-Device सर्व्हिस

BSNL ने Jio-Airtel ला टाकले मागे, लाँच केली भारतात पहिली Satellite-to-Device सर्व्हिस

मुंबई: टेलिकॉम सेक्टरमधील सरकारी कंपनी बीएसएनएलने(BSNL) भारतात सॅटेलाईट टू डिव्हाईस सर्व्हिस लाँच केली आहे. बीएसएनएल देशातील पहिली कंपनी बनली आहे ज्यांनी सर्व्हिस लाँच केली आहे. या सर्व्हिसच्या मदतीने तुम्ही नेटवर्क नसतानाही टेलिकॉम सर्व्हिसेसचा वापर करू शकाल.


यासाठी बीएसएनएलने अमेरिकी सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी Viasat सोबत पार्टनरशिप केली. कंपनीने सॅटेलाईट बेस्ड टू वे मेसेजिंग सर्व्हिसची सफल डेमो इंडियन मोबाईल काँग्रेस २०२४मध्ये केली होती.



BSNL ची Satellite-to-Device सर्व्हिस


याबाबत डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम्युनिकेशनने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. DoT ने लिहिले, बीएसएनएलने देशातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस लाँच केली आहे. आता भारताच्या रिमोट एरियापर्यंत सहम कनेक्टिव्हिटी मिळेल.


या मेसेजसह DoTने एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. यात सर्व्हिसबाबदत माहिती देण्यात आली आहे. काही वेळेआधी Viasatने सांगितले होते की ते भारतात बीएसएनएलसह(BSNL) दुसऱ्या कंपन्यांसोबत मिळून काम करत आहेत. यात सॅटेलाईट सर्व्हिसेसचा कंझ्युमर्स आणि IoT डिव्हाईससेपर्यंत विस्तार केला जाऊ शकतो.

Comments
Add Comment