Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

मतदान करा आणि मिळवा पेट्रोल फ्री

मतदान करा आणि मिळवा पेट्रोल फ्री

पुणे: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. पुण्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

मतदान केल्यानंतर पेट्रोल पंपावर १ लिटर इंजिन ऑइल खरेदी केल्यानंतर ५० रुपयांचे पेट्रोल आणि हॉटेल मधील जेवणाच्या बिलात १० टक्के सूट देण्यात येणार आहे. लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. या मोहिमेत ज्येष्ठ नागरिक,महिला मंडळ, गृहनिर्माण संस्था जोडल्या गेल्या आहेत

Comments
Add Comment