लखनऊ: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून सामूहिक हत्याकांडाची(Murder) धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ज्वेलरने आधी आपली पत्नी, दोन मुली आणि एका मुलाला विषारी पदार्थ देऊन हत्या केली. त्यानंतर स्वत: रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला वाचवले.
या घटनेचा खुलासा सोमवारी संध्याकाळी झाला. ज्वेलर मुकेश कुमार वर्माने व्हॉट्सअॅप स्टेटसवर आपली पत्नी आणि मुलांच्या मृतदेहाचे फोटो टाकले होते. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. त्याचे स्टेटस पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी खोल्यांची तपासणी केली तेव्हा खरंच तेथे मृतदेह होते.
इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, मुकेश कुमारची पत्नी रेखा, मुलगी भव्या(२२), काव्या(१७) आणि मुलगा अभिष्ट(१२) यांचे मृतदेह चार मजली इमारतीच्या विविध खोल्यांमधून ताब्यात घेण्यात आले. या इमारतीत मुकेश कुमार वर्मा आपल्या भावांसह राहत होता.
मुकेश कुमारने आपल्या कौटुंबिक वादामुळे आधी आपल्या कुटुंबियांची हत्या(Murder) केली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर जात मरूधर एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मुकेशला रेल्वे लाईनवर उडी मारताना पाहून लोकांनी आरडाओरड केली. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थिती आरपीएफ जवानांनी त्याला वाचवले.