मुंबई: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ(IND Vs SA )यांच्यात ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. सुरूवातीच्या दोन्ही सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तर तिसरा सामना आज १३ नोव्हेंबरला सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे.
हे मैदान भारतासाठी अनलकी ठरले आहे. अशातच संघासाठी येथील रेकॉर्ड धोक्याची घंटा ठरू शकतात. या मैदानावर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेनपासून वाचून राहिले पाहिजे.
सेंच्युरियनमध्ये भारताचे अपयश
खरंतर, भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर केवळ एक टी-२० सामना खेळला आहे. २१ फेब्रुवारी २०१८मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ६ विकेटनी पराभव सहन करावा लागला होता. क्लासेनला त्या वेळेस प्लेयर ऑफ द मॅच निवडण्यात आले होते.
क्लासेनची जबरदस्त खेळी
त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने ४ बाद १८८ धावा केल्या होत्या. मनीष पांडेने ४८ बॉलमध्ये ७९ धावांची खेळी केली होती. तर महेंद्रसिंग धोनीने २८ बॉलमध्ये ५२ धावा ठोकल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाने १८.४ षटकांत ४ विकेट गमावत सामना जिंकला होता.