Monday, May 19, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Health: तुपाने आपल्या डाएटची सुरूवात करतात या बॉलिवूड अभिनेत्री

Health: तुपाने आपल्या डाएटची सुरूवात करतात या बॉलिवूड अभिनेत्री

मुंबई: आयुर्वेदात तुपाला औषधापेक्षा कमी महत्त्व नाही. जर दररोज तुपाचे सेवन केले तर यामुळे शरीराचे कार्य सुरळीत चालते. आपल्या डाएटमध्ये तुपाचे सेवन करणे आरोग्यासाठी(Health) फायदेशीर मानले जाते. खासकरून जर तूप रिकाम्या पोटी खाल्ले तर शरीर गरम राहते आणि कॅल्शियमची कमतरता दूर होते.


अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही फॅन्सी फूडऐवजी तुपाचे सेवन करतात. रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने शरीर गरम राहते तसेच आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. इतकंच नव्हे तर पोटाचे आरोग्य, त्वचा, केस आणि संपूर्ण आरोग्यासाठी तूप खूप फायदेशीर आहे.


अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या दिवसाची सुरूवात घीकॉफीने करते. यामुळे मेटाबॉलिज्म सुधारते तसेच पचनशक्तीही वाढते. याशिवाय आदिती राव हैदरीही तुपाचे सेवन बुलेट कॉफीच्या रूपात करते.


शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते. तीही एक चमचा तुपाने आपल्या दिवसाची सुरूवात करते.



मलायका अरोराही आपल्या दिवसाची सुरूवात घी कॉफीने करते. जान्हवी कपूरही तूप खाऊन आपल्या दिवसाची सुरूवात करते. याश्वाय करीना कपूर, रकुल प्रीत सिंह, कृती सॅनॉन या अभिनेत्रीही आपल्या दिवसाची सुरूवात तुपासोबत करतात.



तुपाचे फायदे


आपल्या डाएटमध्ये तुपाचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. खासकरून जर तूप रिकाम्या पोटी खाल्ले तर त्यामुळे शरीर गरम राहते आणि कॅल्शियमची कमतरता भरून निघते. इतकंच नव्हे तर सर्दी, ताप, खोकला सारख्या आजारांपासून बचाव होतो. तुपामध्ये व्हिटामिन डी, के, ई आणि ए भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी(Health) गरजेचे असते. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते.

Comments
Add Comment