
मुंबई: एका बिझनेस घोटाळा प्रकरणात झारखंड हायकोर्टाने एमएस धोनीला(MS Dhoni) नोटीस बजावली आहे. भारतीय क्रिकेटरचे जुने बिझनेस पार्टनर्स मिहीर दिवाकर आणि सौम्य दास यांनी मिळून धोनीविरुद्ध काऊंटर केस दाखल केली आहे. खरंतर हे प्रकरण आरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित आहे. यात दिवाकर आणि सौम्य डायरेक्टर पदावर होते. या वर्षी जानेवारीम्ये धोनीने आपले जुन्या सहकाऱ्यांवर आरोप केला होता की डायरेक्टर पदावर असताना त्यांनी फसवणूक केली होती.
आरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट कंपनीने धोनीसोबत करार केला होता की ते एमएस धोनीच्या नावावर भारत आणि परदेशात क्रिकेट अकादमी सुरू करतील ५ जानेवारी भारताचा माजी कर्णधार धोनीने दोन्ही माजी बिझनेस सहकाऱ्यांविरोधात रांचीमध्ये फसवणुकीची केस दाखल केल्यानंत हे प्रकरण समोर आले होते. धोनीचे म्हणणे होते की त्यांची डील २०२१मध्येही संपली होती.

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे (ICC Champions Trophy 2025) यजमानपद पाकिस्तानकडे (Pakistan) राखून ठेवले आहे. त्यानुसार भारतीय संघाला सामना खेळण्यासाठी ...
धोनीविरुद्ध काऊंटर केस
मिहीर दिवाकर आणि सौम्य दास रांचींच्या खालच्या कोर्टात आपल्याविरुद्ध केलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी झारखंड हायकोर्टात पोहोचले आहेत. याच कारणामुळे या प्रकरणाची सुनावणी झारखंड हायकोर्टाने एमएस धोनीला(MS Dhoni) नोटीस पाठवली आहे.