मुंबई: यंदाच्या वर्षी १३ नोव्हेंबरला तुलसी विवाह(Tulsi Vivah) केला जाणार आहे. यादिवशी तुळस आणि शालिग्रामचा विवाह लावला जातो. शास्त्रानुसार तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीशी संबंधित काही चुका करण्यापासून वाचले पाहिजे. या चुकीचे परिणाम वाईट होऊ शकतात.
तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीची पाने तोडली नाही पाहिजेत. जर तुळशीचा वापर असेल तर आधीच तोडून ठेवा.
तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या जवळपास घाण असता कामा नये. तुळशीच्या जवळ चपला अथवा कचरा टाकू नये.
या दिवशी तुळशीला खराब हातांनी स्पर्श करू नये. नाहीतर भगवान विष्णू नाराज होऊ शकतात. तुळशीला स्पर्श करण्याआधी हात जरूर धुवा.
या दिवशी तुलसी मातेची पुजा काळे कपडे घालून करू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.
तुलसी विवाहाच्या दिवशी घरात लसूण-कांद्यासारख्या तामसी पदार्थांचा वापर करू नये. सात्विकतेबाबत खास काळजी घ्या.
तुलसी विवाहाच्या(Tulsi Vivah) दिवशी संध्याकाळच्या वेळेस तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावा. आई लक्ष्मी मंत्राचा जप करा आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करा.