Friday, October 31, 2025
Happy Diwali

Sreejita De : बिग बॉस फेम अभिनेत्रीने एकाच नवऱ्याशी केले वर्षभरात दुसरं लग्न!

Sreejita De : बिग बॉस फेम अभिनेत्रीने एकाच नवऱ्याशी केले वर्षभरात दुसरं लग्न!

मुंबई : हिंदी 'बिग बॉस १६' फेम श्रीजिता डे (Sreejita De) पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मागील वर्षी टिव्ही अभिनेत्री श्रीजिता डे हि ब्लोम-पेपसोबत लग्नबंधनात अडकली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा बंगाली पद्धतीने लग्न केले आहे.

१० नोव्हेंबर रोजी, श्रीजिता आणि मायकेल यांनी गोव्यात मेहेंदी, हल्दी आणि संगीत यांसारख्या कार्यक्रमांसह लग्न केले. यावेळी श्रीजिताचा जवळचा मित्र बिग बॉस मराठी २ चा विजेचा शिव ठाकरेने लग्न समारंभात हजेरी लावली होती.

श्रीजिताने मायकेलसोबतचे मेहंदी आणि हळदीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये श्रीजिता आणि मायकेल मिठी मारताना, एकमेकांसोबतचे क्षण साजरा करताना दिसत आहेत. मायकेलने मेहेंदीसाठी मोती रंगाचा इंडो-वेस्टर्न ड्रेस घातला, त्यावर त्याने स्टायलिश जॅकेट घातले आहे. श्रीजिताने गोल्डन सिक्विन ब्लाउज आणि ड्रेप स्कर्ट घातला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Sreejita De Blohm-Pape (@sreejita_de)

Comments
Add Comment