अनेक रस्ते बंद; ११०० पोलीस तैनात
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या जंगी सभा घेतल्या जात आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी यांची उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.
आज दुपारी दोन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी हे सोलापूर विमानतळावर उतरणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील छोटे छोटे फलक, हातगाडे हटविण्यात आले होते. तसेच विमानतळ ते होम मैदान या मार्गाला जोडणारे छोटे छोटे रस्ते देखील बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले आहेत.
कोणते रस्ते बंद?
पार्श्वभूमीवर रंगभवन, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचकट्टा या चौकातून पुढे वाहनांना सभा संपेर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.
त्याचबरोबर, पंतप्रधानांच्या सभेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, विशेष रुग्णवाहिका, आयसीयूची उपलब्धतासह ५० पेक्षा अधिक डॉक्टर त्या ठिकाणी असणार आहेत.