Tuesday, December 10, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai University: मुंबई विद्यापीठाची आशिया रँकिंगमध्ये दमदार झेप!

Mumbai University: मुंबई विद्यापीठाची आशिया रँकिंगमध्ये दमदार झेप!

मुंबई: मुंबई विद्यापीठाने क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधत ६७ वरून थेट ५२ क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीतही विद्यापीठाने २९१-३०० रँकिंग बँडमधून २४५ व्या स्थानी पोहोचत गुणवत्ता सुधारली आहे. या यशामुळे मुंबई विद्यापीठ आशियातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान बजावू लागले आहे.

क्वाकरेली सायमंड्स (QS) च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने धोरणात्मक सुधारणांना प्राधान्य देत, संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता यासह इतर निकषांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. विद्यापीठाने यंदा १९ वरून ३४ एकूण गुण मिळवत आपला दर्जा अधिक भक्कम केला आहे.

Chennai Heavy Rain : हिवाळ्यात पाऊस! चेन्नईत अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शाळांना सुट्टी

मुंबई विद्यापीठाने पेपर्स पर फॅकल्टी या निकषात ९०.६ गुण मिळवत सर्वाधिक प्रगती साधली आहे. त्यानंतर नियोक्ता प्रतिष्ठा ६४.१, शैक्षणिक प्रतिष्ठा ३४.६, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर ३२.६, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क २१.३ आणि इतर महत्त्वाच्या निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आहे. तसेच, विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील आपले मागील स्तर टिकवले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व घटकांनी संशोधन व विकासाच्या दिशेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. भविष्यात सायटेशन पर पेपर आणि स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -