मुंबई: खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लानचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल( BSNL) एकामागोमाग एक नवे धमाके करत आहे. जुलै महिन्यानंतर कंपनीने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या यादीत अनेक शानदार प्लान सादर केले आहेत. यातच बीएसएनएलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक महिन्यापेक्षा अधिक दिवस चालणारा शानदार प्लान सादर केला आहे.
२५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी
जिओ, एअरटेल आणि व्हीआय आपल्या छोट्या रिचार्ज प्लान्समध्ये ग्राहकांना केवळ २८ दिवसांची व्हॅलिडिटी देते. तर बीएसएनएल २५० रूपयांपेक्षा कमी किंमतीत ४० दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करत आहे. जर तुम्ही बीएसएनएलचे सिम वापरता तर तुमच्यासाठी ही बेस्ट ऑफर ठरू शकते.
२४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान
बीएसएनएलकडून नुकतेच ग्राहकांसाठी २४९ रूपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना स्वस्त ऑफर देत आहेत. या प्लानमध्ये ४५ दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कमध्ये फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. फ्री कॉलिंगसह तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात.
बीएसएनएलच्या(BSNL) या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळते. या प्लानच्या माध्यमातून तुम्ही दिवसभर एंटरनेटमेंट करू शकता. या प्लानमध्ये भरपूर अनलिमिटेड दिला जातो. मात्र २ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला ४० केबीपीएसचा स्पीड मिळेल.