Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीIsrael Hezbollah War : इस्रायलवर मोठा हल्ला! हिजबुल्लाहने डागली १६५ हून अधिक...

Israel Hezbollah War : इस्रायलवर मोठा हल्ला! हिजबुल्लाहने डागली १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे

सात जण जखमी, अनेक वाहनांना आग, इमारतीही कोसळल्या

इस्रायल : गेल्या काही दिवसांपासून इस्रायलवर हल्ले होत असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच पुन्हा हिजबुल्लाहने इस्रायलवर जोरदार हवाई हल्ला (Israel Hezbollah War) केला आहे. या भीषण हल्ल्यात हिजबुल्लाहने १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली असून मोठी हानी झाली झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल लेबनानी अतिरेक्यांनी इस्रायलच्या उत्तरेकडील शहरांवर १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. यामध्ये हिजबुल्लाहने हायफा शहरावर ९० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. त्याचवेळी गॅलिलवर सुमारे ५० रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले आहेत. तसेच रस्त्यावरील अनेक वाहनांना आग लागली असून रहिवासी भागात अनेक इमारती देखील कोसळल्या आहेत. तसेच इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -