Tuesday, December 10, 2024
Homeसंपादकीयअंतराळात अडकल्या सुनीता विल्यम्स

अंतराळात अडकल्या सुनीता विल्यम्स

नासाची एस्ट्रॉनॅट सुनीता विल्यम्स हिची अवस्था सध्या काळजीग्रस्त झाली असून अवघा देश तिच्यामुळे चिंताग्रस्त झाला आहे. सुनीता विल्यम्स सध्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांशी झगडत असून गेल्या जूनपासून ती अवकाशात अडकली आहे. कारण तिच्या स्पेस् क्राफ्टने योग्य काम केले नाही म्हणून ती अधांतरी आहे. भारतीय वंशाची नासा अस्ट्रोनॅट सुनीता विल्यम्सने पृथ्वी बोइंगमधून सोडली होती आणि ती अवकाशात दाखल झाली होती. नासाचा आणखी एक अस्ट्रॉनॅट बॅरी विलमोअर हा सुनीता हिच्याबरोबर अवकाशात गेला आहे आणि तो तिला घेऊन परत येणार नाही, असे आता समजले जात आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत ते दोघेही पृथ्वीवर सुखरूप परत येणार होते. पण अजून ते शक्य दिसत नाही. त्यामुळे अख्ख्या देशात तणावाचे वातावरण आहे. अस्ट्रॅनॉट सुनीता विल्यम्स हिच्या धास्तीने जगभरात चिंता व्यक्त होत असतानाच तिच्या काही प्रतिमा प्रसिद्ध झाल्या आहेत आणि त्या काळजात पाणी उत्पन्न करणाऱ्या आहेत.
सुनीता विल्यम्स हिचे शरीर म्हणजे हाडांच्या काड्या झाल्या आहेत आणि प्रदीर्घ काळ अवकाशात वास्तव्य केल्यामुळे तिच्यात आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या प्रतिमा पृथ्वीपर्यंत येत आहेत त्यावरून सुनीताला वजन कमी करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि हव्या तितक्या कॅलरीज तिला रोजच्या आहारातून दिल्या जाऊ शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ही फारच चिंताजनक स्थिती आहे. अस्ट्रॉनॅटच्या शरीरापर्यंत उच्च दर्जाचे तणाव पोहोचणे ही अत्यंत भीषण परिस्थिती आहे आणि त्याचाच सामना सध्या सुनीता विल्यम्स करत आहे.

सुनीता विल्यम्सबद्दल असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, तिच्या शरीरात पुरेसे अन्न दिले जात आहे की नाही, की अन्नाचा पुरवठा होत नाही हे महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. यानाची अन्नपुरवठा स्थिती उत्तम आहे आणि तिच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही पुरेसे अन्न मिळत आहे अशी स्थिती आहे. दोन याने ८२०० पाऊंड्स अन्नसाठा आणि इंधनाचा साठा आपल्याबरोबर घेऊन जात आहेत. नासाच्या माहितीनुसार, अस्ट्रनॉट्सना विशिष्ट प्रकारचे अन्न पुरवावे लागते. तसेच तेथे विविध प्रकारच्या अन्नाच्या वर्गवारी आहेत की जे अन्न द्यावेच लागते. नासाकडून तिच्या आरोग्यावर बारीक नजर ठेवली जात आहे आणि सुनीता विल्यम्स नाट्यपूर्ण वजनाच्या बाबतीत बदलातून गेली आहे. तिच्या हवाई प्रवासामुळे तिच्या वजनावर आणि शरीरावर परिणाम झाला आहे आणि यामुळेच चिंता व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला तिचा अवकाशात मुक्काम फक्त आठ दिवसांचा होता. पण विल्यम्सचा अवकाशातील मुक्काम आता १५० दिवसांहून जास्त दिवस झाला आहे आणि त्यामुळे सर्व देशभर चिंता व्यक्त होत आहे. बोईंग स्टारलायनर या अंतराळयानाच्या चाचणीसाठी सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बॅरी विलमोअर आठ दिवसांसाठी गेले होते. आता त्यांचा मुक्काम वाढला आहे आणि त्यामुळे देशात काळजी उत्पन्न झाली आहे. भारताने या नासाच्या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुनीता विल्यम्स हिचे नाव अग्रभागी होते. तिला उत्साह प्रचंड होता. पण भारतासाठीही हे आव्हान होते कारण भारताचे दोन अंतराळवीर नासाच्या मोहिमेत सहभागी होणार होते. त्यामुळे भारताने दोघांना परवानगी दिली.

सुनीता विल्यम्स सुरक्षित परत याव्यात यासाठी त्यांच्या गावात प्रार्थना केल्या जात आहेत. तसेच स्टारलायनरमध्ये अडथळे निर्माण झाल्यानेही त्यांच्या परतीमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे देशात अस्वस्थतेचे वातावरण आहे. पृथ्वीवरूनच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. पण नागरिकांची द्विधा मनस्थिती आहे. काहींच्या मते सुनीता चांगली आहे, तर काहींच्या मते सुनीता सुरक्षित परत येणार नाही. त्यामुळे तिच्याबाबत खरे काय ते लोकांना समजले पाहिजे ही लोकांची मागणी आहे. तिच्यासोबत काय होत आहे याची कोणतीही माहिती आम्हाला कुणीही देत नाही. अगदी नासाही नाही. याबाबत तिचा भाऊ नवीन पंड्या म्हणाला, त्याचे म्हणणे प्रातिनिधिक समजायला हवे. भारतीय अस्ट्रोनॉटचा सुनीता विल्यम्स हिचा संबंध झुलासन गावाशी आहे. आता याच झुलासन गावातील ग्रामस्थ आणि नागरिक तिच्या सुरक्षित परत येण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सुनीता विल्यम्स हिच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असल्याने तिच्याबद्दल आता त्या परत येणार की, नाही याबद्दल काळजी उत्पन्न झाली आहे आणि ते साहजिक आहे. पण समजा सुनीता विल्यम्स सुरक्षित परत आल्या नाहीत, तर भारताच्या नासाच्या मोहिमेला आणि खुद्द नासाच्या प्रतिमेला फार मोठा धक्का बसणार आहे.

भविष्यात कुणीही नासावर विश्वास ठेवणार नाही. नासामध्ये भारताचे अनेक वैज्ञानिक काम करत आहेत आणि ते चांगल्या प्रकारे कामही करत आहेत. पण त्यांच्या लौकिकास सुनीता विल्यम्स हिच्या परत न येण्याने धक्का बसणार आहे. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले सुनीता विल्यम्स अजूनही अवकाशात आहेत आणि आता लोकांचा धीर सुटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी देवाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. सुनीता विल्यम्स यांच्या परत न येण्याने नासाच्या पुढील मोहिमांना धक्का बसणार आहे. कारण नासाच्या लौकिकास हा धक्का असेल. त्यामुळे नासाचे शास्त्रज्ञ जीव तोडून त्या परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यासाठी ईश्वराची प्रार्थना आणि नासाच्या वैज्ञानिकांचे प्रयत्न यांचे सातत्य आवश्यक आहे. सुनीता विल्यम्स यांचे गाल बसलेले आहेत आणि आता त्यांची प्रकृती खूपच खालावलेली दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त होणे साहजिक आहे. सुनीता विल्यम्स यांची ही मोहीम अपयशी ठरू नये, कारण मग देशात अस्ट्रनॉट्समध्ये अवकाशात जाण्याची प्रचंड स्पर्धा लागणार आहे. त्यावर परिणाम होऊ शकेल. त्यामुळे भारताच्या उज्ज्वल भवष्यासाठी तरी सुनीता विल्यम्स लवकरात लवकर यशस्वी होऊन येवोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -